IPL 2019 : चेन्नईला मागे टाकून दिल्ली अव्वल, पाहा कोण कितव्या स्थानावर

IPL 2019 : चेन्नईला मागे टाकून दिल्ली अव्वल, पाहा कोण कितव्या स्थानावर

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने सुरुवातीपासून गुणतक्त्यात आपले पहिले स्थान कायम राखले होते. मात्र, राजस्थानला पराभूत करून दिल्ली अव्वल स्थानी पोहचली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत आणि शिखर धवनच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने विजय मिळवला. या विजयाने दिल्लीने यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. सुरुवातीपासून अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी घसरला.

दिल्ली आणि चेन्नईने आतापर्यंत 7 सामन्यात विजय मिळवले असून दोन्ही संघांचे गुण समान झाले आहेत. रनरेटच्या जोरावर दिल्लीने बाजी मारली. दिल्लीने 11 सामने तर चेन्नईने 10 सामने खेळले आहे. चेन्नईचा मंगळवारी हैदराबादसोबत सामना असून यात विजय मिळवून चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याची संधी  असणार आहे.

चेन्नईच्या संघाला मागच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर दिल्लीने सलग दोन सामने जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

पॉइंट टेबल

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

VIDEO: ...म्हणून मोदी पवारांविरोधात बोलतात- रोहित पवार

First published: April 23, 2019, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading