मिश्राची 'ती' चूक दिल्लीला पडली असती महागात, पाहा VIDEO

मिश्राची 'ती' चूक दिल्लीला पडली असती महागात, पाहा VIDEO

मोक्याच्या क्षणी रिषभ पंत बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकात नाट्यमय घडामोडी घडल्या.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीने अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सलामीवीर पृथ्वी शॉच्या अर्धशतकानंतर रिषभ पंतने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने हैदराबादला पराभूत केलं. या विजयासह दिल्लीने फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे. शुक्रवारी त्यांचा सामना चेन्नईशी होणार आहे. 163 धावांचा पाठलाग करताना धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 66 धावांची भागिदारी केली. धवनला बाद करून दीपक हूडाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकांत सहज विजय मिळेल असे वाटत असताना पंत बाद झाला. शेवटच्या षटकात किमो पॉलने चौकार मारून विजय मिळवला.

दरम्यान, दिल्लीला फक्त दोन धावा हव्या असताना शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर नाट्यमय घडामोडी घडल्या. यात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अमित मिश्रा बाद झाला. चेंडू यष्टीमागे गेल्यानंतर त्याने धाव घेतली. यावेळी यष्टीरक्षक साहाने केलेला थ्रो गोलंदाजाच्या हातात आला. खलील अहमदने चेंडू थ्रो करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मिश्रा स्टंपच्या आडवा आला. त्यामुळे थ्रो बसला नाही. यावेळी तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यु घेतला. यात अमित मिश्राची चूक असल्याचे आढळल्यानंतर त्याला बाद करण्यात आले. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूत हैदराबादला तीन धावांची गरज होती. किमो पॉलने चौकार मारत एक चेंडू राखून विजय मिळवला.

तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने दिल्लीला 163 धावांचं आव्हान दिलं. दिल्लीविरुद्ध हैदराबादचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि मार्टिन गुप्टिल प्रथम फलंदाजीला मैदानात उतरले. पहिल्याच चेंडूवर साहाला मैदानावरील पंचांनी बाद दिले. यावेळी साहाने मार्टिन गुप्टीलशी चर्चा करून डीआरएसचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी त्याला नॉट आऊट दिलं. याचा फायदा साहाला उठवता आला नाही. तो 8 धावांवर बाद झाला.

सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 19 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्यांनंतर पांडेने 30 धावा केल्या. त्यानंतर केन विल्यम्सन (28), विजय शंकर (25)आणि मोहम्मद नबी (20) यांच्या खेळीमुळे हैदराबादने 20 षटकांत 162 धावा केल्या. किमो पॉलच्या 20 व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूवर हैदराबादने तीन विकेट गमावल्या.

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 11:43 PM IST

ताज्या बातम्या