Elec-widget

CSKvsDC Highlights : असे बाद झाले दिल्लीचे फलंदाज, पाहा VIDEO

CSKvsDC Highlights : असे बाद झाले दिल्लीचे फलंदाज, पाहा VIDEO

दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या. यात रिषभ पंतने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 10 मे : दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला -- धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला चेन्नईने तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला पायचित करून दीपक चाहरने पहिलं यश मिळवून दिलं. तिसऱ्या षटकात दीपक चाहरने टाकलेला चेंडू दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला खेळता आला नाही. तो 5 धावांवर पायचित झाला.


पृथ्वी शॉनंतर सलामीवीर शिखर धवन धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला. 14 चेंडूत 18 धावा करणाऱ्या धवनला हरभजनने बाद केले.


धवननंतर कुलिन मुनरो 20 धावांची भर घालून बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने ब्राव्होकरवी झेलबाद केलं.

Loading...


कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या 75 धावा झाल्या असताना ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 13 धावा केल्या.


श्रेयस अय्यर पाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. अक्षर पटेलने फक्त 3 धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर ताहीरने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.


अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि रुदरफोर्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुदरफोर्ड हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर वॉटसनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.


किमो पॉलचा त्रिफळा उडवून ब्राव्होने दिल्लीला सातवा धक्का दिला.


19 व्या षटकात उंच फटका मारण्याच्या नादात दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 25 चेंडूत 38 धावांची खेळी केली.


पंतनंतर जडेजाने ट्रेन्ट बोल्टला बाद केलं. त्याने 3 चेंडूत 6 धावा केल्या.VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com