VIDEO : 2 चेंडूत 3 विकेट तरीही हॅट्ट्रिक नाही, पाहा क्रिकेटमधील अनोखी घटना

VIDEO : 2 चेंडूत 3 विकेट तरीही हॅट्ट्रिक नाही, पाहा क्रिकेटमधील अनोखी घटना

20 व्या षटकात हैदराबादचे तीन फलंदाज दोन चेंडूत बाद झाले.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बाद फेरीचा सामना चेपॉकवर होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने दिल्लीला 163 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीविरुद्ध हैदराबादचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि मार्टिन गुप्टिल प्रथम फलंदाजीला मैदानात उतरले. पहिल्याच चेंडूवर साहाला मैदानावरील पंचांनी बाद दिले. यावेळी साहाने मार्टिन गुप्टीलशी चर्चा करून डीआरएसचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी त्याला नॉट आऊट दिलं. याचा फायदा साहाला उठवता आला नाही. तो 8 धावांवर बाद झाला.

सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 19 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्यांनंतर पांडेने 30 धावा केल्या. त्यानंतर केन विल्यम्सन (28), विजय शंकर (25)आणि मोहम्मद नबी (20) यांच्या खेळीमुळे हैदराबादने 20 षटकांत 162 धावा केल्या. किमो पॉलच्या 20 व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर हैदराबादने तीन विकेट गमावल्या.

20 व्या षटकात किमो पॉलच्या दोन चेंडूवर हैदराबादने तीन विकेट गमावल्या. किमोने चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबीला अक्षर पटेलकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पुढचा चेंडू वाइड होता. या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात दीपक हूडा धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर राशिद खान झेलबाद झाला.

गुणतक्त्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली आणि सनरायझर्स यांच्यातील विजेत्या संघाची फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईशी लढत होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची असून यात पराभव झाल्यास स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण 14 सामने झाले आहेत. यात दिल्लीने 5 तर हैदराबादने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. हैदराबादचा संघ वरचढ दिसत असला तरी त्यांच्या संघात वॉर्नर आणि बेअरस्टोची कमी जाणवणार आहे.

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 9:41 PM IST

ताज्या बातम्या