VIDEO : पंतचा झेल सुटल्यावर धोनी नाराज, चाहरला मिळाली 'शिक्षा'

VIDEO : पंतचा झेल सुटल्यावर धोनी नाराज, चाहरला मिळाली 'शिक्षा'

झेल घेतल्यानंतर चाहर सीमारेषेबाहेर गेल्यानं पंतला जीवदान आणि 6 धावा मिळाल्या.

  • Share this:

विशाखापट्टणम, 10 मे : दिल्लीने दिलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 षटकांत पूर्ण केलं. या विजयासह त्यांनी फायनलला आठव्यांदा धडक मारली. फाफ डुप्लेसीस आणि शेन वॉटसन यांनी अर्धशतके केली. त्यानंतर रैनाने 11 धावा केल्या. तर रायडु 20 धावांवर नाबाद राहिला. धोनी उंच फटका मारण्याच्या नादात 9 धावांवर बाद झाला. या पराभवाने दिल्लीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

दरम्यान क्षेत्ररक्षण करताना पुन्हा एकदा धोनीचा राग बघायला मिळाला. वेगवान गोलंजाज दीपक चाहरने रिषभ पंतचा झेल घेताना केलेल्या चुकीनंतर धोनी रागावला. यंदाच्या हंगामात चाहरला तीन वेळा धोनीच्या रागाला सामोरं जावं लागलं आहे. चाहरने झेल घेतला पण तो सीमारेषेबाहेर गेल्यानं दिल्लीला 6 धावा मिळाल्या. यावेळी विकेट मिळाल्याचा जल्लोष करणारे खेळाडू नाराज झाले. धोनीच्या चेहऱ्यावर ही नाराजी स्पष्ट दिसत होती. यानंतर लगेच धोनीने लॉग ऑफवरून चाहरला हटवले.

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला 147 धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.दिल्लीला चेन्नईने तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला पायचित करून दीपक चाहरने पहिलं यश मिळवून दिलं. तिसऱ्या षटकात दीपक चाहरने टाकलेला चेंडू दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला खेळता आला नाही. तो 5 धावांवर पायचित झाला. पृथ्वी शॉनंतर सलामीवीर शिखर धवन धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला. 14 चेंडूत 18 धावा करणाऱ्या धवनला हरभजनने बाद केले.

धवननंतर कुलिन मुनरो 20 धावांची भर घालून बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने ब्राव्होकरवी झेलबाद केलं. कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या 75 धावा झाल्या असताना ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 13 धावा केल्या.

श्रेयस अय्यर पाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. अक्षर पटेलने फक्त 3 धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर ताहीरने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि रुदरफोर्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुदरफोर्ड हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर वॉटसनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर किमो पॉलचा त्रिफळा उडवून ब्राव्होने दिल्लीला सातवा धक्का दिला. पंतने एका बाजुने सावध खेळ केला. मात्र, 19 व्या षटकात उंच फटका मारण्याच्या नादात दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 25 चेंडूत 38 धावांची खेळी केली. पंतनंतर जडेजाने ट्रेन्ट बोल्टला बाद केलं. त्याने 3 चेंडूत 6 धावा केल्या. अमित मिश्रा 6 तर इशांत शर्मा 10 धावांवर नाबाद राहिले.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान

First published: May 11, 2019, 12:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading