VIDEO : आम्ही येतोय! 'या' दोन मुंबईकरांचा हिटमॅनला इशारा

VIDEO : आम्ही येतोय! 'या' दोन मुंबईकरांचा हिटमॅनला इशारा

चेन्नई आणि मुंबई यांच्यात रविवारी फायनल सामना होणार आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 11 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नईने दिल्लीला पराभूत करून फायनलला धडक मारली आहे. आता त्यांची गाठ मुंबईशी पडणार आहे. आतापर्यंत आयपीएलमधील आकडेवारी पाहता मुंबईचं पाऱडं जड दिसतं. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

चेन्नईने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर फिरकीपटू हरभजन सिंगने ब्राव्होची मुलाखत घेतली. यावेळी ब्राव्होला हरभजनने पंतच्या कॅचबद्दल विचारले. त्यानंतर हरभजनने मुंबई इंडियन्स विरुद्ध फायनल खेळणार असल्याचे सांगत दोघेही त्या संघाकडून खेळल्याची आठवण सांगितली. ब्राव्हो म्हणाला की, यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही टॉपचे संघ आहेत. यांच्यातील फायनल सामन्यासारखा दुसरा नाही होऊ शकत.

दिल्लीने दिलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 षटकांत पूर्ण केलं. या विजयासह त्यांनी फायनलला आठव्यांदा धडक मारली. फाफ डुप्लेसीस आणि शेन वॉटसन यांनी अर्धशतके केली. त्यानंतर रैनाने 11 धावा केल्या. तर रायडु 20 धावांवर नाबाद राहिला. धोनी उंच फटका मारण्याच्या नादात 9 धावांवर बाद झाला. या पराभवाने दिल्लीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

सलामीवीरांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने विजय मिळवला. या दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची संधी पहिल्याच षटकात गमावणं दिल्लीला महागात पडलं.चेन्नईला पहिल्याच षटकात जीवदान मिळालं. चेन्नईच्या ट्रेन्ट बोल्टने टाकलेल्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिल्लीच्या डुप्लेसीसने फटका मारला. यावेळी फलंदाजामध्ये समन्वय नसल्याने दोघेही एकाच दिशेला धावले. मात्र, या संधीचा क्षेत्ररक्षकांना फायदा घेता आला नाही. त्यांनी ओव्हर थ्रो केल्याने चेन्नईला अवांतर धावा मिळाल्या.

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला 147 धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.दिल्लीला चेन्नईने तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला पायचित करून दीपक चाहरने पहिलं यश मिळवून दिलं. तिसऱ्या षटकात दीपक चाहरने टाकलेला चेंडू दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला खेळता आला नाही. तो 5 धावांवर पायचित झाला. पृथ्वी शॉनंतर सलामीवीर शिखर धवन धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला. 14 चेंडूत 18 धावा करणाऱ्या धवनला हरभजनने बाद केले.

धवननंतर कुलिन मुनरो 20 धावांची भर घालून बाद झाला. त्याला रविंद्र जडेजाने ब्राव्होकरवी झेलबाद केलं. कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या 75 धावा झाल्या असताना ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 18 चेंडूत 13 धावा केल्या.

श्रेयस अय्यर पाठोपाठ अक्षर पटेलही बाद झाला. अक्षर पटेलने फक्त 3 धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर ताहीरने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि रुदरफोर्ड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुदरफोर्ड हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर वॉटसनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर किमो पॉलचा त्रिफळा उडवून ब्राव्होने दिल्लीला सातवा धक्का दिला. पंतने एका बाजुने सावध खेळ केला. मात्र, 19 व्या षटकात उंच फटका मारण्याच्या नादात दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 25 चेंडूत 38 धावांची खेळी केली. पंतनंतर जडेजाने ट्रेन्ट बोल्टला बाद केलं. त्याने 3 चेंडूत 6 धावा केल्या. अमित मिश्रा 6 तर इशांत शर्मा 10 धावांवर नाबाद राहिले.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 11, 2019, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading