दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार की नाही? प्रशिक्षकांनी दिलं उत्तर

दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार की नाही? प्रशिक्षकांनी दिलं उत्तर

यंदाच्या हंगामात धोनीला दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मुंबईविरुद्ध त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईला पराभवाचा धक्का बसला.

  • Share this:

चेन्नई, 1 मे : सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी होत असलेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात दोन वेळा त्याला तब्येत बिघड़ल्याने विश्रांती देण्यात आली होती. मुंबई विरुद्धच्या सामन्यातही त्याला विश्रांती दिली होती. याचा फटका चेन्नईला बसला होता. दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे. मात्र, तो खेळणार की नाही याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं.

धोनीला सुरुवातीला पाठदुखीच्या त्रासाने हैदराबादविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. तर मुंबईविरुद्ध आजारी पड़ल्याने त्याला खेळता आले नव्हते. त्याने सराव सत्रातही भाग घेतला नाही. दुसरीकडे फाफ डुप्लेसीस आणि जडेजा यांनाही मागच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यानी सरावात भाग घेतला असून ते खेळतील असं स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटलं आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीने 12 पैकी 10 सामने खेळले आहेत. यात त्याने 314 धावा केल्या असून यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. चारवेळा तो नाबाद राहिला आहे. यष्टीरक्षणातही त्याने 6 झेल आणि तीन यष्टीचित केले आहेत.

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्टबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 05:23 PM IST

ताज्या बातम्या