चेन्नईच्या घरच्या मैदानावर मुंबईच सुपर, CSKवर 46 धावांनी दणदणीत विजय

मुंबईने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना मुरली विजनं ने एकाकी झुंज दिली.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 09:37 AM IST

चेन्नईच्या घरच्या मैदानावर मुंबईच सुपर, CSKवर 46 धावांनी दणदणीत विजय

चेन्नई, 26 एप्रिल : चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबईने 46 धावांनी पराभूत केले. मुंबईने दिलेल्या 156 धावांच्य़ा आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 109 धावांपर्यंत मजल मारू शकला. विजय शंकर वगळता इतर फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. मुरली विजय 35 चेंडूत 38 धावा केल्या. सलामीवीर शेन वॉटसन मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सुरेश रैना, अंबाती रायडु, केदार जाधव आणि ध्रुव शौर्य हे फलंदाज लागोपाठ बाद झाले. मुरली विजयने एकाकी झुंज दिली.

महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था बिकट झाली. ब्राव्होने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलिंगाने त्याचा त्रिफळा उडवला. तळाच्या फलंदाजांना मलिंगाने दणका दिला. त्याने 37 धावा देत 4 बळी घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या चेन्नईने मुंबईला 4 बाद155 धावांत रोखले. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने चेन्नईसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं. रोहित शर्माने 48 चेंडूत 67 धावांची खेळी केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक लवकर बाद झाला. त्याला 15 धावांवर दीपक चाहरने बाद केले.

लेविस आणि रोहित शर्माने अर्धशतकी भागिदारी केली. संघाच्या 99 धावा झाल्या असताना लेविस बाद झाला. त्याला सेंटनरने ब्राव्होकरवी झेलबाद केलं. लेविसने 30 चेंडूत 32 धावा केल्या. लेविसनंतर आलेल्या कृणाल पांड्याला एका धावेवर ताहीरने बाद केलं तर रोहित शर्मा सेंटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केरॉन पोलार्डने संघाला 150 चा टप्पा पार करून दिला. पांड्या 23 तर पोलार्ड 13 धावांवर नाबाद राहिला.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई 10 सामन्यात 6 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावरच्या या सामन्यात मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे.

Loading...

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...