VIDEO : धोनी नसल्याचा फटका, 'या' खेळाडुला मिळालं जीवदान

VIDEO :  धोनी नसल्याचा फटका, 'या' खेळाडुला मिळालं जीवदान

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई दुसऱ्यांदा महेंद्रसिंग धोनीशिवाय मैदानात उतरली आहे.

• Share this:

चेन्नई, 26 एप्रिल : धोनीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या चेन्नईचा मुंबई इंडियन्ससोबत सामना होत आहे. या सामन्यात चेन्नईचं नेतृत्व सुरेश रैनाकडे सोपवण्यात आलं आहे. चेन्नईने संघात तीन बदल केले आहेत. तर मुंबईने दोन खेळाडूंना संधी दिली आहे.

सलामीवीर क्विंटन डिकॉकला दीपक चाहरने बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर सहाव्या षटकात हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर इविन लेविसच्या बॅटला घासून चेंडू रायडुच्या हातात गेला. मात्र, ही गोष्ट हरभजनसह रायडुच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे लेविसला जीवदान मिळाले. याठिकाणी धोनी असता तर निश्चितच त्याने अपिल केलं असतं. त्यावेळी लेविस 15 धावांवर खेळत होता. लेविसला जीवदानाचा फायदा मिळाला नसला तरी त्याने 30 धावांची खेळी करून रोहित शर्माला साथ दिली.

The edge that CSK missedhttps://t.co/EwJAbagd0Y
— Suraj Yadav (@imyadavsuraj) April 26, 2019

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई 10 सामन्यात 6 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावर शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. तसेच आयपीएलमध्ये या दोन्ही संघांतील सामना नेहमीच चुरशीचा राहिला आहे.

वाचा : धोनीसोबत खेळले होते वडील, आता मुलगा गाजवतोय IPL

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला 37 धावांनी पराभूत केलं होतं. शुक्रवारी होत असलेला सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर होत असून इथं चेन्नईने यंदाच्या हंगामात पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत करणं मुंबईसमोर मोठं आव्हान असेल. घरच्या मैदानावर धोनीच्या संघाला पराभूत करणं कठिण आहे. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई यांच्यात 25 सामने झाले आहेत. यापैकी मुंबईने 14 तर चेन्नईने 11 सामने जिंकले आहेत.

VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या