News18 Lokmat

MI vs CSK : चेन्नई पराभवाचा वचपा काढणार? मुंबईसमोर 'हे' आव्हान

चेन्नई आणि मुंबईने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर यंदाच्या गुणतक्त्यात चेन्नई पहिल्या आणि मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 03:50 PM IST

MI vs CSK : चेन्नई पराभवाचा वचपा काढणार? मुंबईसमोर 'हे' आव्हान

चेन्नई, 26 एप्रिल : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई 10 सामन्यात 6 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावर शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. तसेच आयपीएलमध्ये या दोन्ही संघांतील सामना नेहमीच चुरशीचा राहिला आहे.

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला 37 धावांनी पराभूत केलं होतं. शुक्रवारी होत असलेला सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर होत असून इथं चेन्नईने यंदाच्या हंगामात पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत करणं मुंबईसमोर मोठं आव्हान असेल. घरच्या मैदानावर धोनीच्या संघाला पराभूत करणं कठिण आहे. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई यांच्यात 25 सामने झाले आहेत. यापैकी मुंबईने 14 तर चेन्नईने 11 सामने जिंकले आहेत.

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Loading...


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...