VIDEO : पराभूत होऊनही 'या' गोष्टीचा श्रेयस अय्यरला अभिमान

VIDEO : पराभूत होऊनही 'या' गोष्टीचा श्रेयस अय्यरला अभिमान

दिल्लीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्नं भंगलं तरी अय्यरने आपलं स्वप्न सत्यात उतरल्याचं पराभवानंतर म्हटलं.

  • Share this:

विशाखापट्टणम, 11 मे : सात वर्षांनी प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर दिल्लीच्या पदरी निराशा पडली. दुसऱ्या क्लालिफायर सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवाने त्यांचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न भंगले. चेन्नईने या विजयासह आठव्यांदा फायनलला धडक मारली आहे. रविवारी मुंबई आणि चेन्नई यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

चेन्नईविरुद्ध सामन्यानंतर मुलाखतीत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीबद्दल समाधानी असल्याचं म्हटलं आहे. तसेच यंदाच्या हंगामात एक कर्णधार म्हणून खूप काही शिकायला मिळालं. त्याचबरोबर श्रेयसनं कर्णधारपदाचे श्रेय महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दिलं आहे.

धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांच्याकडून खूप शिकलो. तसेच तिघेही संघाचं नेतृत्व कसं करतात हे पाहता आलं. त्यांच्यासोबत नाणेफेक करायला उभा राहणं ही बाब माझ्यासाठी अभिमानाची होती असंही श्रेयस अय्यर म्हणाला. कर्णधार होणं सोपं नाही हे मी ऐकलं होतं. त्याचा अनुभवही घेतला त्यामुळे मी आता आनंदी आहे असं श्रेयसने सांगितलं.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 11, 2019, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading