VIDEO : 10 वर्षांनी ईशांत शर्माने केली ही कामगिरी, धोनीला आवरले नाही हसू

VIDEO : 10 वर्षांनी ईशांत शर्माने केली ही कामगिरी, धोनीला आवरले नाही हसू

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज ईशांत शर्माने 3 चेंडूत 10 धावांची खेळी केली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 11 मे : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने चेन्नईला 147 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात रिषभ पंतने सर्वाधिक 38 धावा केल्या. मात्र, चर्चा झाली ती 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ईशांत शर्माची. त्याने 3 चेंडूत 10 धावा केल्या. यातील पहिल्या चेंडूवर धाव घेता आली नाही. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूत त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला.

20 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या तळाच्या फलंदाजांनी 17 धावा केल्या. यात ईशांत शर्माशिवाय ट्रेंट बोल्टनेसुद्धा षटकार मारला.

ईशांत शर्माने असे चौकार षटकार मारले की सर्वांनाच आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे समालोचक संजय मांजरेकर यांनी भारताचा सर्वात उपयुक्त कसोटी फलंदाज असं पहिल्या चेंडूवेळी म्हटलं होतं. तेवढ्यात ईशांत शर्माने चौकार मारला.

ईशांत शर्माने चेन्नईविरुद्ध मारलेला षटकार टी20 मधील दुसऱाच षटकार आहे. याआधी त्याने 2009 मध्ये पहिला षटकार मारला होता. दुसरा षटकार मारण्यासाठी त्याला तब्बल 10 वर्ष लागली. यानंतर ईशांत शर्माच्या या टेन इयर चॅलेंजची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 11, 2019, 12:06 PM IST

ताज्या बातम्या