धोनीने पराभवाचं खापर फोडलं 'या' खेळाडूंवर

धोनीने पराभवाचं खापर फोडलं 'या' खेळाडूंवर

चेन्नईला आरसीबीविरुद्ध फक्त एका धावेनं पराभव पत्करावा लागला.

  • Share this:

बेंगळुरू, 22 एप्रिल : आयपाएलच्या 12 व्या हंगामात आरसीबीने चेन्नईचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला. 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला 160 धावांपर्यंत मजल मारता आली. अखेरच्या चेंडूवर बेंगळुरूने विजय मिळवला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची 48 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी व्यर्थ गेली.

चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. शेवटच्या चेंडूवर धोनीला फटका मारता आला नाही. तरीही धोनीने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र पार्थिव पटेलने शार्दुल ठाकूरला धावबाद केलं.

चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा पराभव आहे. या पराभवानंतर बोलताना धोनी म्हणाला की, सामना खूप चांगला झाला. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आरसीबीला कमी धावसंख्येवर रोखण्यात त्यांना यश आलं. मात्र, आघाडीच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे खेळ केला नाही. प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी कशी आहे हे पाहून फलंदाजांनी रणनिती आखून खेळायला हवं होत असं धोनी म्हणाला.

अंबाती रायडु वगळता आघाडीच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शेन वॉटसन, फाफ डुप्लेसीस दोघेही 5 धावांवर बाद झाले तर सुरेश रैनाला भोपळाही फोडता आला नाही. तर केदार जाधव 9 धावा काढून बाद झाला.

आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यावर मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव येतो. त्यांना मैदानात उतरल्यावर लगेच मोठे फटके खेळता येत नाहीत. शेवटच्या षटकांत सामना जिंकणं आवाक्याबाहेर जातं. त्यावेळी एखादा निर्धाव चेंडूसुद्धा सामना हातातून निसटण्यासा कारणीभूत ठरू शकतो. या सामन्यातही तेच झाले.

आरसीबीचा कर्णधार विराट म्हणाला की, 19 व्या षटकापर्यंत सामन्यावर आमची पकड होती. 160 धावांचे रक्षण करणं कठिण होतं. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात धोनीनं भीती घातली होती. या विजयाने आनंदी असल्याचं विराट म्हणाला.

बेंगळुरुविरुद्ध पराभव झाला तरी चेन्नईचं पहिलं स्थान अबाधित आहे. आरसीबीचा हा 10 सामन्यातील तिसरा विजय असून गुणतक्त्यात ते शेवटच्या स्थानावर आहेत.

पॉइंट टेबल

VIDEO: क्रीडा विश्वातील घडामोडींचा सुपरफास्ट आढावा

First published: April 22, 2019, 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading