News18 Lokmat

धोनीची 'ती' चूक पडली महागात, ...म्हणून झाला पराभव

IPL 2019 : बेंगळुरुविरुद्ध पराभव झाला तरी चेन्नईचं पहिलं स्थान अबाधित आहे

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 09:50 AM IST

धोनीची 'ती' चूक पडली महागात, ...म्हणून झाला पराभव

बेंगळुरू, 22 एप्रिल : चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने चेन्नवर एका धावेने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 161 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मैदानात उतरलेल्या चेन्नईने 20 षटकांत 160 धावांपर्यंत मजल मारली.

शेवटच्या षटकात धोनीने 24 धावा काढल्या. महेंद्र सिंग धोनीने 48 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. मागच्या सामन्यात तंदुरुस्त नसल्याने धोनी खेळू शकला नव्हता.

गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई आणि शेवटच्या स्थानी असलेल्या बेंगळुरू यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला आहे. हा सामना चेन्नईला जिंकण्याची संधी होती. 18 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीला धाव घेण्याची संधी होती. मात्र, त्याला धाव घेता आली नाही. जर ही एक धाव काढली असती तर कदाचित चेन्नईला सामना जिंकता आला असता.

आरसीबीचा गोलंदाज उमेश यादवने शेवटचा चेंडू संथ गतीने टाकून धोनीला चकवले. तरीही धोनीने धावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूला शार्दूल ठाकूर तयार नव्हता आणि पार्थिव पटेलने त्याला बाद केले. यामुळे चेन्नईचा एका धावेनं पराभव झाला.

बेंगळुरुविरुद्ध पराभव झाला तरी चेन्नईचं पहिलं स्थान अबाधित आहे. आरसीबीचा हा 10 सामन्यातील तिसरा विजय असून गुणतक्त्यात ते शेवटच्या स्थानावर आहेत.

Loading...

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


VIDEO: क्रीडा विश्वातील घडामोडींचा सुपरफास्ट आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...