धोनीसोबत खेळले होते वडील, आता मुलगा गाजवतोय IPL

यंदाच्या आयपीएलमधील कमी वयाचा असलेल्या या खेळाडूचे वडील महेंद्रसिंग धोनीचा पहिला बळी ठरले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 05:59 PM IST

धोनीसोबत खेळले होते वडील, आता मुलगा गाजवतोय IPL

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान यांच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या नाबाद 97 धावांच्या खेळीनंतरही केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताने दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या रियान पराग या 17 वर्षीय खेळाडूने 31 चेंडूत 47 धावा केल्याने विजय मिळवला आला. रियान धोनीचा चाहता असून त्याचा एक फोटोही व्हायरल होत आहे.

रियान परागचा आणि धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हाचा आहे. त्यावेळी रियान पराग 7 वर्षांचा होता. रियान पराग धोनीचा मोठा चाहता होता.

रियानचे वडील आणि धोनी रेल्वेच्या एका स्पर्धेत खेळले होते. धोनीने 2000 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते.  त्याशिवाय 2004 मध्ये नागपूरला झालेल्या सामन्यात धोनी आणि पराग दास त्यांच्या संघातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले होते. त्यावेळी पराग दास हेच धोनीचा पहिला बळी ठरले होते.

Loading...

रियानने 11 एप्रिलला चेन्नईविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात खेळणं रियानसाठी एक स्वप्न होतं. 2007 मध्ये गुवाहाटीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावेळी रियान परागने धोनीसोबत फोटो काढला होता.

यंदाच्या आय़पीएलमध्ये रियानने दोनवेळा मॅचविनिंग खेळी साकारल्या आहेत. रियान पराग 2018 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्येही खेळला आहे. तसेच अंडर 19 कसोटी मालिकेतही तो सहभागी होता.

क्रिकेटमध्ये चमक दाखवणाऱ्या रियानला त्याला स्विमिंग आणि वेटलिफ्टिंगसुद्धा आवडतं. त्याच्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ अपलोड केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...