अश्विनचे मंकडिंग, विराट-धोनीच्या रागासह 'या' वादांनी गाजलं आयपीएल

खेळाडू आणि पंच तर वादात अडकलेच पण सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनाही आयपीएलमध्ये अडचणींचा सामना करावा लागला.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 11:59 AM IST

अश्विनचे मंकडिंग, विराट-धोनीच्या रागासह 'या' वादांनी गाजलं आयपीएल

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील फायनल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हैदराबादमध्ये रंगणार आहे. या हंगामात अनेक विक्रम झाले पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती वादग्रस्त घटनांची. यामध्ये अश्विनसह धोनी आणि कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचीही नावे आली.

आयपीएलमध्ये खेळाडूंचीच नाही तर पंचांचे नावही वादात ओढले गेले. चुकीच्या निर्णयाने झालेल्या वादात खेळाडूंनी पंचांवर राग काढला.

चिन्नास्वामी स्टेडियमवर बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि पंच लॉन्ग यांच्यात वाद झाला. यानंतर पंचांनी रूमचा दरवाजा तोडल्याचं प्रकरणही समोर आलं होतं.

Loading...

पंचानी चुकीचा निर्णय देण्याची घटना बेंगळुरु आणि मुंबई यांच्यातील सामन्यावेळी घडली होती. मलिंगाने टाकलेला नोबॉल पंचांकडून दुर्लिक्षित झाला. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा याविरोधात आवाज उठवला होता.

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसुद्धा त्याच्या रागामुळे चर्चेत आला होता. त्याने मैदानात येऊन पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल त्याला सामन्याच्या मानधनावर 50 टक्के रकमेचा दंड करण्यात आला होता.

पंजाबचा कर्णधार आर अश्विनने मंकिडिंग पद्धतीने जोस बटलरला बाद केल्यानंतर बराच वाद झाला होता. यावेळी अश्विनवर अखिलाडूवृत्तीचा आरोपही करण्यात आला तर काहींनी त्याची बाजू घेतली.

याशिवाय आयपीएलमधील संघांचे सल्लागार म्हणून काम करत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या दुहेरी भूमिकेबद्दलही चर्चा झाली. याबाबत त्यांना बीसीसीआयने नोटीसही पाठवली होती. यावर तिनही क्रिकेटपटूंनी दुहेरी भूमिकेचा आरोप फेटाळून लावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...