रक्तबंबाळ होऊनही खेळलेल्या वॉटसनचा हा VIDEO पाहुन तुम्हीही व्हाल भावुक

रक्तबंबाळ होऊनही खेळलेल्या वॉटसनचा हा VIDEO पाहुन तुम्हीही व्हाल भावुक

अंतिम सामन्यात त्याने केलेली खेळी व्यर्थ गेली असली तरी गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता.

  • Share this:

मुंबई, 16 मे : आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. पराभवानंतरही चेन्नईची चर्चा झाली ती वॉटसनने पायाला दुखापत झाल्यानंतरही केलेल्या खेळीची. याबाबत चेन्नईचा खेळाडू हरभजन सिंगने वॉटसनच्या दुखापतीची माहिती दिली होती.

वॉटसनला झालेली दुखापतीने त्याला नंतर नीट चालताही येत नव्हतं. सामन्यानंतरचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो लंगडताना दिसत आहे. वॉटसन चेन्नईच्या विजयासाठी झटत होता तेव्हा त्याच्या गुढघ्यातून रक्त येत होते. पण त्याने संघातील कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही आणि तो फलंदाजी करत होता. संघाला विजयाच्या जवळ पोहोचवल्यानंतर तो जेव्हा धावबाद होऊन परतला तेव्हा टीममधील सर्वांना त्याच्या दुखापतीबद्दल समजले.

IPLच्या वेबसाईटवर अंतिम सामन्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की शेट वॉटसनच्या डाव्या गुडघ्यातून रक्त येत आहे. रक्त येण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की एक मोठा रक्ताचा डाग दिसत आहे. सामना झाल्यानंतर संघाच्या विजयासाठी जिरबाज खेळी करणाऱ्या वॉटसनच्या गुडघ्यावर 6 टाके घातले गेले.

मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात वॉटसनने 59 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 80 धावांची खेळी केली. वॉटसनने चेन्नईला जवळ जवळ चौथ्ये विजेतेपद मिळवून दिले होते. पण 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो धावबाद झाला. दोन रन घेण्याच्या प्रयत्नात तो पळाला पण क्रीझपर्यंत पोहचला नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये शेन वॉटसनने 17 सामन्यात 398 धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीवरुद्ध त्याने अर्धशतक केले होते. अंतिम सामन्यात देखील त्याने हीच तशीच कामगिरी केली पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे विजेतेपद मिळून देऊ शकला नाही.

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

First published: May 16, 2019, 10:49 AM IST

ताज्या बातम्या