मुंबईचा रुबाब! रैनाही बदलू शकला नाही 'हा' इतिहास

गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईला घरच्या मैदानावर मुंबईकडून पराभव पत्करावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 06:56 AM IST

मुंबईचा रुबाब! रैनाही बदलू शकला नाही 'हा' इतिहास

आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना हा हाय व्होल्टेज असतो. यंदाच्या सिझनमध्ये चेन्नईविरुद्धच्या दोन्ही सामन्यात मुंबईने विजय मिळवला.

यंदाच्या आय़पीएलमध्ये चेन्नईने घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नव्हता. त्यामुळे मुंबईविरुद्ध ते जिंकणार का याकडे लक्ष लागून राहिले होते.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. यात मुंबईने 16 वेळा तर चेन्नईने 12 वेळा विजय मिळवला आहे.

Loading...

चेन्नईने घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध शेवटचा विजय 2010 मध्ये मिळवला होता. त्यानंतर चेन्नई एकदाही मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत करू शकली नाही.

चेन्नईने यंदाच्या हंगामात एम चिदंबरम स्टेडियमवर एकही सामना गमावलेला नाही. त्यांना याआधी 2015 मध्ये मुंबईनेच पराभूत केलं होतं. त्यानंतर आजच्या सामन्यात पुन्हा चेन्नईला पराभवाचा धक्का दिला.

यंदाच्या आय़पीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून प्लेऑफमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आता एका विजयाची गरज आहे. अद्याप त्यांचे दोन सामने बाकी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 06:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...