IPL 2019 : धोनीच्या गैरहजेरीत चेन्नईचा पराभव, रैना म्हणाला...

धोनी, जडेजाच्या अनुपस्थितीत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नईचा 46 धावांनी पराभव झाला.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 08:32 AM IST

IPL 2019 : धोनीच्या गैरहजेरीत चेन्नईचा पराभव, रैना म्हणाला...

चेन्नई, 27 एप्रिल : चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबईने 46 धावांनी पराभूत केले. मुंबईने दिलेल्या 156 धावांच्य़ा आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 109 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुरली विजय वगळता इतर फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. विजय शंकरने 35 चेंडूत 38 धावा केल्या. सलामीवीर शेन वॉटसन मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सुरेश रैना, अंबाती रायडु, केदार जाधव आणि ध्रुव शौर्य हे फलंदाज लागोपाठ बाद झाले. विजय शंकरने एकाकी झुंज दिली. महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत चेन्नईची अवस्था बिकट झाली. ब्राव्होने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलिंगाने त्याचा त्रिफळा उडवला. तळाच्या फलंदाजांना मलिंगाने दणका दिला. त्याने 37 धावा देत 4 बळी घेतले.

मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज लागोपाठ अंतराने बाद होत गेले. यामुळेच चेन्नईचा पराभव झाला असं सुरेश रैनाने सांगितले. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. 155 धावांचा पाठलाग करणं शक्य होतं मात्र मधल्या षटकांत विकेट गमावल्याने सामना हातातून निसटल्याचं रैनानं कबूल केलं.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई 11 सामन्यात 7 विजयांसह दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.

पॉइंट टेबल


Loading...

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाजVIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...