सचिनला वाढदिवसाला मिळाली नोटीस, 28 एप्रिलपर्यंत उत्तर द्या!

सचिनला वाढदिवसाला मिळाली नोटीस, 28 एप्रिलपर्यंत उत्तर द्या!

भारताच्या तीन माजी दिग्गज क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या लोकपालांनी नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : बीसीसीआयच्या लोकपालांनी सौरभ गांगुलीनंतर आता सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही नोटीस पाठवली आहे. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरला 24 एप्रिलला त्याच्या वाढदिवशीच नोटीस पाठवली आहे.

सचिन तेंडुलकरसह भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणलासुद्धा बीसीसीआयच्या लोकपालांची नोटीस मिळाली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी दोन माजी क्रिकेटपटूंना आयपीएल फ्रँचाइजीच्या मेंटॉर आणि सल्लागार समितीत असल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा आणि लक्ष्मण सनरायझर्स हैदराबादचा मेंटॉर आहे.

लोकपाल जैन यांनी नोटीस पाठवल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी 28 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचे उत्तर लेखी द्यायचे असून याबद्दल बीसीसीआयचे म्हणणेसुद्धा असावे असं म्हटलं आहे.

वाचा : ISSF World Cup : मनु भाकर- सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या अगोदर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला अशी नोटीस पाठवण्यात आली होती. हे तीनही क्रिकेटपटू सीएसीचा भाग होते. तिघांनी जुलै 2017 मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांची निवड केली होता.

वाचा : जत्रेत फुगे फोडायच्या नादाने शिकला नेमबाजी, विश्वविक्रमी सुवर्णवेध घेणाऱ्या सौरभ चौधरीची प्रेरणादायी कहाणी

सध्या बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनचा मुंबई इंडियन्सच्या संघाशी कोणताही करार नाही. तसेच तीनही क्रिकेटपटू सल्लागार समितीचे सदस्य म्हणून स्वेच्छेने काम करत आहेत. त्यांच्याविरुद्ध मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती.

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

First published: April 25, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading