दिल्ली, 05 मे : दिल्ली कॅपिटल्सचा लेग स्पिनर अमित मिश्राने शनिवारी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मॅन ऑफ दि मॅच पटकावला. त्याने 17 धावा देत 3 विकेट घेतल्या. या सामन्यात अमित मिश्राला हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. मात्र, सहकारी खेळाडूने झेल सोडल्याने हॅट्ट्रिक हुकली.
सामन्यानंतर मिश्राने हॅट्ट्रिक करता आली नाही याबद्दल नाराजीही व्यक्त केली. बोल्टने झेल सोडल्यानंतर त्याला अपशब्द वापरल्याची कबुलीही त्याने दिली. मी त्याला म्हटलं होतं सोपा झेल आहे तो पकडता आला असता.
अमित मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये तीन हॅट्ट्रिक आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध शनिवारी चौथी हॅट्ट्रिक करण्याची संधी हुकली. ट्रेंट बोल्टला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानलं जातं.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने कोटलावर अमित मिश्राच्या हाती चेंडू सोपवला. मिश्राने त्याच्या गोलंदाजीवर 12 व्या षटकात सामन्याचे चित्र पालटले. दुसऱ्या चेंडूवर श्रेयस गोपालला बाद केले. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीला बाद केले. चौथ्या चेंडूवर कृष्णप्पा गौतमचा झेल ट्रेंट बोल्टने सोडला आणि मिश्राची हॅट्ट्रिक हुकली.
आतापर्यंत आयपीएलमध्ये अमित मिश्राने 155 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा दुसऱ्या स्थानावर आहे.
SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...