World Cup : संघातून वगळले तरीही रहाणे जाणार इंग्लंडला

अजिंक्य रहाणेला भारताच्या वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 10:29 AM IST

World Cup : संघातून वगळले तरीही रहाणे जाणार इंग्लंडला

दिल्ली, 25 एप्रिल : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये खेळणार आहे. मे ते जून दरम्यान होणाऱ्या इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये तो खेळणार आहे. हँपशायर संघातून खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. 14 मे रोजी तो काउंटी क्रिकेमध्ये पदार्पण करू शकतो.

रहाणेची इंग्लंडमधील कामगिरी चांगली आहे. त्याने 2014 मध्ये लॉर्डसवर शतक झळकावले होते. भारताकडून कसोटीच्या 95 डावात त्याने 3 हजार 500 धावा केल्या आहेत. यात 9 शतकांचा समावेश आहे. रहाणेने हँपशायरकडून खेळण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रहाणेसह 8 खेळाडूंना काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी पाठवू शकते. यात चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, आर अश्विन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्याच्या आधी सर्रेकडू काउंटी क्रिकेट खेळणार होता. मात्र, दुखापतीने त्याला जाता आले नव्हते.

बीसीसीआयने खेळाडूंसाठी लीस्टरशायर, ससेक्स आणि नॉटिंगहमशायर या संघांशी चर्चा केली आहे. चेतेश्वर पुजाराचा यॉर्कशायरसोबत तीन वर्शांचा करार आहे. इशांत शर्मा ससेक्सकडून सहभागी झाला होता. त्याला गेल्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर तो इंग्लंडला गेला होता.

आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या रहाणेला सुरुवातीच्या खराब कामगिरीमुळे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. त्यानंतर राजस्थानचे नेतृत्व स्टीव्हन स्मिथकडे सोपवण्यात आले. कर्णधार पद स्मिथकडे दिल्यानंतर रहाणेने शतकही झळकावले आहे.

Loading...

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...