IPL 2019 : 'या' दिग्गज परदेशी खेळाडूंना मिळाली नाही एकही संधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंना आयपीएलमध्ये मात्र खेळण्याची संधी मिळाली नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 07:26 AM IST

IPL 2019 : 'या' दिग्गज परदेशी खेळाडूंना मिळाली नाही एकही संधी

आयपीएलमध्ये जवळपास क्रिकेट खेळणाऱ्या देशातील सर्वच खेळाडूंना सहभागी होण्याची इच्छा असते. अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. यात ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर यांसारख्या खेळाडूंची नावे घेता येतील. मात्र, असेही अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांसारखे कॅरेबियन खेळाडू आयपीएल गाजवत असताना यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीनला मात्र खेळायला मिळाले नाही. 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेल्या रामदीनने 47 डावांत 560 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर वर्नन फिलेंडर वेगवान गोलंदाजी करतो. त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 58 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 7 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 259 विकेट घेतल्या आहेत. त्यालाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Loading...

2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराजने एका षटकात 6 षटकार मारलेल्या स्टुअर्ट ब्रॉडलासुद्धा आय़पीएलमध्ये खेळता आलेलं नाही. त्याने एकूण 141 टी 20 सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीनंतरही त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही.

2014 मध्ये जोश हेजलवुडला मुंबई इंडियन्सने 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर 2015 मध्ये त्याने आयपीएल मधेच सोडले होते. हेजलवबडने एकूण 37 टी20 मध्ये 45 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार असलेल्या जो रुटला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. रूटने 31 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले असून त्यात 842 धावा केल्या आहेत. नाबाद 90 धावा ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 07:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...