IPL 2019 : प्ले ऑफचे सामने पाहण्यासाठी लवकर घरी जा कारण...

IPL 2019 : प्ले ऑफचे सामने पाहण्यासाठी लवकर घरी जा कारण...

7 ते 12 दरम्यान आयपीएलचे प्ले ऑफचे सामने सुरु होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : सध्या आयपीएलच्या बाराव्या हंगामाला शेवटचे दोन आठवडे उरले असताना, सर्व संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. यात चेन्नई आणि दिल्ली अशा दोन संघांनी याआधीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळं आयपीएलनं बाद फेरीच्या सामन्यांमध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळं जर तुम्हाला आयपीएलचे सामने पाहायचे असतील तर, लवकर घरी जा. कारण आता 8 वाजता सुरु होणारे आयपीएलचे सामने आता 7.30 वाजता सुरु होणार आहे. सध्या तरी, 8 वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांची नाणेफेक ही 7.30 वाजता व्हायची. मात्र बाद फेरीच्या सामन्यांमध्ये ही नाणेफेक 7 वाजता होणार आहे.7 ते 12 दरम्यान आयपीएलचे प्ले ऑफचे सामने सुरु होणार आहे. दरम्यान याबाबत प्रशासकीय समितीनं, “सामन्यांचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीशी आमची चर्चा झाली असून, प्ले-ऑफचे सामने 8 ऐवजी 7.30 वाजता सुरु होतील.”, अशी माहिती पीटीआयशी बोलताना दिली. 2018 सालीही प्ले-ऑफचे सामने 8 ऐवजी 7.30 वाजता खेळवण्यात आले होते.

सध्या आयपीएलच्या बाराव्या हंगामातले अनेक सामने रात्री बारा वाजेपर्यंतही सुरु असतात. याबाबत अनेक समालोचक आणि खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं बीसीसीआयनं हा महत्त्वाचा बदल केला होता.VIDEO: उमा भारतींची गळाभेट, साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 29, 2019 06:54 PM IST

ताज्या बातम्या