IPL 2019 : मुंबईचे चाहते कधीही विसरू शकणार नाहीत, असा 'हा' शेवटचा क्षण पाहाच

IPL 2019 : मुंबईचे चाहते कधीही विसरू शकणार नाहीत, असा 'हा' शेवटचा क्षण पाहाच

शेवटची ओव्हर...शेवटचा चेंडू आणि मुंबईनं जिंकला सामना.

  • Share this:

हैदराबाद, 12 मे : आयपीएलच्या अंतिम सामन्यात अगजी शेवटच्या मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर फक्त एका धावेने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर मलिंगाची कमाल चालली आणि मुंबईहा सामना जिंकला. हा सामना एवढा अविश्वसनीय होता की, मुंबई जिंकली यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. शेवटच्या सामन्यापर्यंत चेन्नई सामना जिंकेल असं वाटत असताना, मलिंगानं शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि सामना बदलला. पण या फाययनलचा टर्निंग पॉइंट हा शेन वॉटसनचा रन आऊट असल्याचे चाहत्यांना वाटले. शेन अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना आऊट झाला आणि तिथेच सामना फिरल्याचे म्हटले गेले. तर, सचिनच्या मते धोनीची विकेट ही मुंबईसाठी महत्त्वाची होती. एक चोरटी धाव काढण्याच्या नादात धोनी बाद झाला. दरम्यान शेवटच्या एका चेंडूत 2 धावांची गरज असताना मुंबईनं सामना जिंकला. या विजयानंतर रोहितही काही क्षण अवाक झाला.

मुंबईनं सलग चौथ्यांदा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला. याआधी मुंबईनं 2013, 2015, 2017 अशी तीन विजेतेपदं मिळवली आहेत.

दरम्यान, टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलार्डच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 150 धावा केल्या. पोलार्डनं चेंडूत धावा केल्या. 25 चेंडूत 41 धावा केल्या.या धावांचा पाठलाग करताना वॉटसननं चांगली फलंदाजी केली. 135.59च्या स्ट्राईक रेटनं वॉटसनन 8 चौकार आणि 4 षटकार मारत अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला. दरम्यान मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना, आक्रमक फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाला सध्या ब्रेक लागला आहे. ड्यु प्लेसिस बाद झाल्यानंतर लगेचच काही चेंडूच्या फरकावर सुरेश रैना आणि अंबाती रायडू बाद झाला. रायडू आणि रैना या दोघांनी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान रैनाला राहुल चहरनं तर, रायडूला बुमराहनं बाद केले. रैना 8 धावांवर तर, रायडू केवळ एक धाव करत बाद झाला. त्यामुळं मुंबईनं सामन्यात पुनरागमन केलं.

चेन्नई विरोधात मुंबईचं किंग

आयपीएलमधला सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांच्यातला झाला. दरम्यान या द्वंद्व युध्दात मुंबईचं प्रदर्शन जास्त दिसलं. दोन्ही संघांनी एकूण 28 सामने खेळले आहेत. यात मुंबईनं 17 तर चेन्नईनं 11वेळा सामना जिंकला आहे.

वाचा- IPL 2019 : धोनी आणि रोहित नाही तर, फायनलमध्ये ‘तिची’ चर्चा

वाचा- IPL 2019 : धोनीची स्मार्ट खेळी, ट्रॅपमध्ये फसला रोहित

वाचा- IPL 2019 : कतरीना कैफ करणार MI ला सपोर्ट, पण सलमान म्हणतो...

मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

First published: May 13, 2019, 12:06 AM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading