RCB ने खिल्ली उडवल्यानंतर दिंडानं दिलं 'असं' चोख उत्तर

RCB ने खिल्ली उडवल्यानंतर दिंडानं दिलं 'असं' चोख उत्तर

उमेश यादवच्या कामगिरीबद्दल सांगताना आरसीबीने अशोक दिंडाची खिल्ली उडवली होती.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघात खेळलेला वेगवान गोलंदाज अशोक दिंडाला आयपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्याच्या गोलंदाजीचा फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत त्याला आयपीएलच्या संघातही स्थान मिळाले नव्हते.

आयपीएयमध्ये आता कोणत्याही गोलंदाजाला जास्त धावा काढल्या तर त्याला अशोक दिंडाशी जोडलं जात होतं. दिंडावर चहुबाजुंनी टीका केली जात होती. विशेष म्हणजे आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही ट्विट केले होते. यावर दिंडाने आपल्या इन्स्टाग्रामवरून जबरदस्त उत्तर दिलं आहे.

https://twitter.com/search?q=dinda%20acadamy&src=typdhttps://twitter.com/search?q=dinda%20acadamy&src=typdhttps://twitter.com/search?q=dinda%20acadamy&src=typdhttps://twitter.com/search?q=dinda%20acadamy&src=typd

आरसीबीचा गोलंदाज उमेश यादवला यंदाच्या आयपीएलमध्ये चमक दाखवता आली नाही. त्यानंतर त्याचे नाव दिंडाशी जोडले गेले. यावर भडकलेल्या दिंडाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत टीकाकारांना उत्तर दिलं.

अशोक दिंडानं टि्वटरवर म्हटलं आहे की, तिरस्कार करणाऱ्यांना या आकडेवारीची मदत होईल. तुमचे उद्योग बंद करा कारण त्या सल्ल्यात काहीच नाही. माझे नाव घेऊ नका असा इशाराही त्याने दिला आहे. दिंडाच्या अशा प्रकारे व्यक्त होण्यावरही टीकाकारांनी त्याला आणखी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

First published: April 26, 2019, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading