IPL 2019 : कुंबळेनं काढला विराटवर राग, केलं संघातून डच्चू

IPL 2019 : कुंबळेनं काढला विराटवर राग, केलं संघातून डच्चू

आयपीएलच्या या हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर अनिक कुंबळेनं एका ड्रीम टीमची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगाम संपण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत. यात मुंबई इंडियन्सनं चेन्नईला नमवत याआधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं फायनलमध्ये मुंबईला कोणता संघ टक्कर देणार हे उद्या दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. तर, 12 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होईल. दरम्यान आयपीएलच्या या हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर भारताचा श्रेष्ठ गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिक कुंबळेनं आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात काही महत्त्वाच्या खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात विदेशी खेळाडूंची जास्त चलती होती. फलंदाजांपासून ते गोलंदाजीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात विदेशी खेळाडूंच मोलाचं योगदान होतं. एवढचं नाही तर यंदाच्या हंगामात सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे डेव्हिड वॉर्नर. त्यामुळंच कुंबळेच्या संघात त्यानं सलामीवीर म्हणून वॉर्नर आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. तर, मधल्या फळीत दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, एमएस धोनी आणि ऋषभ पंत यांना स्थान दिलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संघात कुंबळेनं विराटला स्थान दिलं नाही आहे. विराट सोबतच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही डच्चू देण्यात आला आहे.

वाचा- World Cup : केदार जाधवबाबात मोठा खुलासा, ‘ही’ डेडलाईन महत्त्वाची !

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू संघानं आयपीएलच्या या हंगामात निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळं ते आयपीएलच्या गुणतालिकेत अगदी तळाला होते. विराटच्या संघाला त्यांना सलग तिसऱ्या हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे. याबाबत कुंबळेनं, ‘’विराटची संघनिवड चुकली. त्यामुळं त्यांचा संघ बलाढ्य असला तरी, त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांनी अंतिम संघात केवळ तीनच परदेशी खेळाडूंना खेळवले. त्यांच्या फलंदाजीची बाजू पूर्णपणे एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यावरच अवलंबुन होती. या दोघांच्या अपयशानंतर अन्य फलंदाजांना आपली कामगिरी बजावण्यात अपयश आले. तर गोलंदाजीत वरिष्ठ गोलंदाज उमेश यादवला सातत्य राखता आलेले नाही." , असे सांगितले.

वाचा- DC vs CSK : चेन्नईचं पारडं जड, पण धोनीला दिल्लीच्या 'या' युवा खेळाडूंपासून खतरा !

ही आहे कुंबळेची ड्रीम टीम

ओपनिंग – डेव्हिड वॉर्नर, लोकेश राहुल

मिडल ऑर्डर – श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी

ऑलराऊंडर खेळाडू – आंद्रे रसल, हार्दिक पांड्या

गोलंदाज – इम्रान ताहीर, श्रेयस गोपाळ, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह

वाचा- IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं

VIDEO : जब मिले दो यार, मग मैदानात नुसता राडा!

First published: May 9, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या