VIDEO: रसेल म्हणतो...'बाहों में आ सोनिये, बस आज रात के लिए'

VIDEO: रसेल म्हणतो...'बाहों में आ सोनिये, बस आज रात के लिए'

रसेलनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात 13 सामन्यांत 205.64च्या स्ट्राईक रेटने 510 धावा चोपल्या आहेत.

  • Share this:

कोलकाता, 04 मे : आयपीएलचा बारावा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे, त्यामुळं सध्या कोणते चार संघ प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करतीय याकडे सर्वांच्या नजरा आहे. यात दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या तीन संघानी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं आता केवळ एक स्थान बाकी आहे.

दरम्यान शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सने आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकातानं 7 विकेटनं पंजाबवर विजय मिळवला. त्यामुळं 12 गुणांसह कोलकाता आता 5व्या स्थानावर आहे. त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी एक विजय तर हैदराबादचा पराभव गरजेचा आहे.

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात कोलकाताकडून शुभमन गिलनं तुफान फलंदाजी करत मोहालीवर गिल वादळ आणलं. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या जवळ आणले. दरम्यान या विजयानंतर कोलकाता संघाचे खेळाडू चांगलेच जोषात दिसले.

या सामन्यात रसेलची बॅट नेहमीप्रमाणे तळपली नसली तरी, सामन्यानंतर मात्र त्यानं KKRचा स्टेज चांगलाच गाजवला. कॅरेबियन खेळाडू हे नेहमीच आपल्या नृत्यानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्यात रसेल हा खुपच मनमोकळ्या स्वभावामुळे ओळखले जातात. त्यामुळे त्यांना फार क्वचितच तणावात कोणी पाहीले असेल. दरम्यान या सामन्यानंतर रसेलनं चक्क बॉलिवूड गाणं गायलं आणि सहकाऱ्यांना त्यावर ठेका धरायला भाग पाडले.

रसेलनं आपल्या सहकाऱ्यांसोबत अक्षय कुमारचा सिनेमा देसी बॉईज या सिनेमातील सुबह होने ना दे...हे गाणं गायलं. काराओके पध्दतीनं रसेल गाणं गाताना दिसला. दरम्यान त्याला कर्णधार दिनेश कार्तिकनंही चांगलीच साथ दिली. आयपीएलच्या बाराव्या हंगामात रसेलनं आपल्या तुफान फटकेबाजीनं हंगाम चांगलेच गाजलं. त्यानं 13 सामन्यांत 205.64च्या स्ट्राईक रेटने 510 धावा चोपल्या आहेत. यात तब्बल 52 षटकारांचा समावेश आहे.

VIDEO: इथे पाण्यासाठी 2 किमी करावी लागते पायपीट

First published: May 4, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading