रसेल-लिन यांचं वादळ रोखण्याचं 'विराट' आव्हान, पाहा VIDEO

रसेल-लिन यांचं वादळ रोखण्याचं 'विराट' आव्हान, पाहा VIDEO

सामन्याआधीच रसेल-लिनचं वादळ, चेन्नास्वामीवर आज विराटच्या संघासमोर आव्हान

  • Share this:

बेंगळुरू, 05 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा 17 वा सामना बेंगळुरूतील चेन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. आरसीबीने अजून एकही विजय मिळवलेला नाही. तर दुसरीकडे केकेआरच्या आंद्रे रसेल आणि ख्रिस लीन यांच्या सरावानेच विराट कोहलीच्या संघाला धडकी भरली आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेल तंदुरुस्त असून त्यामुळे संघात सध्या आनंदाचं वातावरण आहे. बेंगळुरूत ख्रिस लिन आणि आंद्रे रसेल या दोघांचा सराव करत असलेला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात दोघांनीही आपण आजच्या सामन्यासाठी तयार असल्याचेच दाखवले आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू ख्रिस लिनने आयपीएलमध्ये आतापर्यंत मोठी खेळी केलेली नाही. त्यामुळे या सामन्यात तो कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर आंद्रे रसेल संघात पुन्हा परतल्याने केकेआरचा उत्साह वाढला आहे.

आतापर्यंत खेळण्यात आलेल्या तीनही सामन्यात रसेलने जबरदस्त कामगिरी केली आहे. चेन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सरावावेळी रसेल आणि लिन दोघांनीही त्यांची ताकद दाखवली आहे. अजून एकही सामना जिंकता न आल्याने आरसीबीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे.

First published: April 5, 2019, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading