OMG : 11 वर्षांपासून पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर असलेला हा विक्रम मोडीत

पाकिस्तानच्या जलद गोलंदाजानं एक असा रेकॉर्ड केला होता, जो आयपीएलच्या गेल्या 11 वर्षांत कोणत्याही गोलंदाजाला तोडता आला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 08:42 AM IST

OMG : 11 वर्षांपासून पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर असलेला हा विक्रम मोडीत

हैदराबाद, 07 एप्रिल : आयपीएलचे बारावे हंगाम कोणी गाजवलं असेल तर, युवा खेळाडूंनी. पण हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या खेळाडूनं असं काही केलं की पहिल्या हंगामातील एका पाकिस्तानी खेळाडूची तुम्हाला आठवण येईल. 2008च्या पहिल्या हंगामात अनेक पाकिस्तानी खेळाडूंचा भरणा होता. मात्र, त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू एकही हंगाम खेळू शकल नाही. पण पहिल्याच हंगमात पाकिस्तानच्या जलद गोलंदाजानं एक असा रेकॉर्ड केला होता, जो आयपीएलच्या गेल्या 11 वर्षांत कोणत्याही गोलंदाजाला तोडता आला नाही.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघानं सगळ्यांना हैराण करत, पहिले विजेतेपद पटकावले. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात पाकिस्तानी खेळाडू सोहेल तनवीरचे महत्त्वपुर्ण योगदान होते.

तनवीरनं आयपीएलच्या पहिल्या हंगामात 11 सामन्यात 22 विकेट घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. त्याचा सर्वोत्तम प्रदर्शन चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात पाहायला मिळाला. तनवीरनं चार ओव्हरमध्ये 14 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. हा आयपीएलच्या इतिहासातील गोलंदाजीतला सर्वात्तम प्रदर्शन ठरला आहे.

मात्र, हैदराबाद विरोधात मुंबई संघाचा खेळाडू अलझारी जोसेफ यानं हा विक्रम तोडला. आयपीएलच्या बाराव्या हंगामात  आपल्या पर्दापणातच जोसेफनं 12 धावा देत 6 विकेट घेतल्या. आणि त्यानं 11 वर्षांचा तनवीरचा रेकॉर्ड मोडला.



ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज एडम जम्पा हा या रेकॉर्डमध्ये दुसऱ्या स्थानावर होता. जम्पानं 2016 मध्ये 19 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. तर, आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात अनिल कुंबलेनं राजस्थान रॉयल्स विरोधात केवळ 5 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. असाच काहीसा विक्रम इशांत शर्मानंही केला आहे. इशांतनं आयपीएलमध्ये 12 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. मात्र, या सगळ्या अलझारी जोसेफचा पर्दापणातच केलेला हा नवा विक्रम अव्वल ठरला.


VIDEO: चड्डी-बनियान गँगचा पेट्रोल पंपावर दरोडा; दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 08:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...