IPL 2019 : कर्णधारपदावरुन हटवलं म्हणून रहाणेची सटकली, केला हा विक्रम

IPL 2019 : कर्णधारपदावरुन हटवलं म्हणून रहाणेची सटकली, केला हा विक्रम

रहाणेला गवसलेला सुर हा चाहत्यांसाठी आनंदाजी बाब असणार आहे.

  • Share this:

जयपूर, 22 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थानचा पुर्व कर्णधार अजिंक्य रहाणे याला सुर गवसावा, याची वाट प्रत्येक क्रिकेट चाहता करत होता. दरम्यान याआधी रहाणेच्या खराब कामगिरीमुळं त्याच्याकडून राजस्थान संघाचं कर्णधारपदही काढून घेण्यात आलं होतं. यामुळं अनेक वादंग निर्माण झाले.

रहाणेच्या ऐवजी स्टीव्ह स्मिथच्या हाती राजस्थानचं कर्णधारपद देण्यात आलं. रहाणेला फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र दिल्ली विरुद्धच्या सामन्यात अखेर रहाणेची बॅट तळपली.

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रहाणेनं तिसरं जलद अर्धशतक नोंदवलं. त्यानं 33 चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं.

एवढचं नाही तर, जयपूरच्या मानसिंग मैदानावर 1 हजार धावांचा टप्पा पुर्ण करणारा रहाणे एकमेव फलंदाज आहे. तर, दिल्ली विरोधात रहाणेनं आतापर्यंत 746 धावा केल्या आहेत. यात आघाडीवर 802 धावांसह विराट कोहली आहे.

राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत स्मिथने नेतृत्व सार्थकी ठरवत संघाला पाच गडय़ांनी विजय मिळवून देणारी खेळी साकारली. त्यामुळे मागील लढतींमधील विजयांसह दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. परंतु दिल्लीच्या तुलनेत राजस्थानला विजयाची अधिक आवश्यकता आहे.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

First published: April 22, 2019, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading