IPL 2019 : रहाणेची 'अजिंक्य' खेळी, सात वर्षांनी केला 'हा' पराक्रम

कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर अखेर अजिंक्य रहाणेची बॅट तळपली.

  • Share this:

आयपीएलच्या बाराव्या हंगामात अजिंक्य रहाणेनं कर्णधार म्हणून सुरुवात केली. मात्र, संघाला मिळणाऱ्या पराभवामुळं त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं. कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर अखेर रहाणेची बॅट तळपली.

रहाणेनं जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरोधात शतक ठोकलं. यंदाच्या हंगामातलं रहाणेचं हे पहिलं शतक आहे. तर, आयपीएलमधलं दुसरं शतक आहे. रहाणेनं तब्बल सात वर्षांनंतर शतक ठोकलं.

अजिंक्य रहाणेनं दुसरं शतक लगावताच विरेंद्र सहवाग,मुरली विजय आणि संजू सॅमसन यांची बरोबरी केली. आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतक करणाऱ्या भारतीयांमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दिल्लीच्या संघाविरोधात शतक करणारा रहाणे हा तिसरा खेळाडू आहे. दिल्ली विरोधात रहाणेनं 7 वर्षांनंतर शतक ठोकलं आहे. याआधी ख्रिस गेल आणि मुरली विजय यांनी दिल्ली संघाविरोधात शतक केलं होतं.

आपलं शतक पुर्ण करण्याआधी रहाणेला जीवनदान मिळालं होतं. पाचव्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाईन लेगला इशांत शर्माने रहाणेचा झेल सोडला. त्यानंतर रहाणेने खणखणीत षटकार व चौकार खेचला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 10:49 PM IST

ताज्या बातम्या