मोहाली, 05 मे : आयपीएलचा बाराहा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. यात चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामातली प्ले ऑफ गाठणारा पहिला संघ ठरला. त्यामुळं गतविजेत्या चेन्नईला यंदाही आयपीएलमधलं आपलं पाचवं विजेतेपद मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यात धोनीला आपले महत्त्वाचे फलंदाज आणि गोलंदाज यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
यात पहिल्या हंगामापासून धोनीच्या सोबतीला असणाऱ्या सुरेश रैनावर संघाची मुख्य मदार आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आजही सुरेश रैना पहिल्या क्रमांकावर आहे. पण तरी यंदाच्या हंगामात सुरेश रैनी बॅट हवी तशी तळपली नाही. त्यामुळं रैनाला गुरुमंत्र देण्यासाठी धोनीचं पुढं आलं. धोनी आणि रैनाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात धोनी, रैनाचा फलंदाजीबाबत काही टिप्स देताना दिसला.
दरम्यान धोनीनं रैनाला दिलेला हा गुरुमंत्र चांगलाच कामी आल्याचं चित्र आजच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिसलं. मोहालीवर होत असलेल्या सामन्यात रैनानं 139.47च्या स्टाईक रेटनं 38 चेंडूत 53 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकार यांचा समावेश होता. दरम्यान हे सुरेश रैनाचं आयपीएलमधलं 39वं अर्धशतक होतं.
तर, ड्यू प्लेसिस आणि रैना या जोडीनं शतकी भागीदारीचा पल्ला ओलांडताच एक विक्रम नावावर केला. पंजाबविरुद्ध यंदाच्या मोसमात चेन्नईकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला.
SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'