IPL 2019 : 13 सामन्यानंतर अखेर विराटला लागली 'ही' लॉटरी

विराटच्या बंगळुरू संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी, विराटला शेवटच्या सामन्यात हा आनंद मिळाला.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 09:23 PM IST

IPL 2019 : 13 सामन्यानंतर अखेर विराटला लागली 'ही' लॉटरी

बंगळुरू, 04 मे : आयपीएलचा बारावा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आला असताना, सध्या प्ले ऑफसाठी चुरस रंगली आहे. मात्र, या सगळ्यातून आधीच बाहेर पडलेला संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ, कारण हा साखळी सामन्यात बाहेर गेला आहे. या हंगामात सर्वात वाईट खेळ हा विराटच्या सेनेचा झाला आहे. मात्र असे असले तरी, आजच्या हैदराबदा विरुद्धच्या सामन्यात विराटला एक जबरदस्त लॉटरी लागली.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होत असलेल्या सामन्यात, कोहली सामन्यापूर्वीच आनंदात पाहायला मिळाला. कारण यंदाच्या हंगामात ही गोष्ट पहिल्यांदाच कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळाली. या सामन्यापूर्वी कोहली आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन टॉससाठी एकत्र आले होते. टॉस झाल्यावर कोहलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. कारण यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोहलीने टॉस जिंकला जिंकली होती.


Loading...


दरम्यान नाणेफेक झाल्यानंतर कोहलीनं आपला आनंदही व्यक्त केला. तो म्हणाल की, "यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मी टॉस जिंकलो, त्यामुळे मी खुश आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये मला कधीच नाणेफेक जिंकता आली नाही. पण मोसमाच्या अखेरीस तरी मला टॉस जिंकता आला आहे."

दरम्यान, बंगळुरु संघाचं आयपीएमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी, आज बंगळुरूचा संघ हैदराबाद विरोधात लढत आहे. हा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा असला तरी, बंगळुरू त्यांना या स्पर्धेच्या बाहेर काढू शकते.

वाचा- IPL 2019 : शाहरुखचा विकेण्ड विराटच्या हाती, 240 चेंडूत ठरणार KKRचं भवितव्य

IPL 2019 : आसामच्या 'या' खेळाडूचा झंझावती विक्रम, द्रविडच्या शिष्यांनाही टाकलं मागे

बंगळुरूचा 'हा' खेळाडू म्हणतो आयपीएल वर्ल्ड कपपेक्षा भारी !


VIRAL VIDEO : बर्थ डे बम्पस देताना बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू? हे आहे सत्य!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...