S M L

VIDEO: जेव्हा एका हातानं एबी चेंडूला स्टेडियमबाहेर धाडतो तेव्हा...

डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Updated On: Apr 24, 2019 11:09 PM IST

VIDEO: जेव्हा एका हातानं एबी चेंडूला स्टेडियमबाहेर धाडतो तेव्हा...

बंगळुरू, 24 एप्रिल : बंगळुरू आणि पंजाब यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात बंगळुरूनं पंजाबला 202 धावांचे आव्हान दिलं. मात्र एकवेळ अशीही होती, जेव्हा बंगळुरूचा संघ 160चा पल्ला गाठेल असे वाटत होते. त्यावेळी मैदावात उतरला तो मिस्टर 360.

सलग सात सामने हरल्यानंतर बंगळुरू संघानं आयपीएलच्या बाराव्या हंगामात कमबॅक केलं. मात्र आता जर प्ले ऑफमध्ये त्यांना स्थान पटकावयाचे असेल तर, सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

आजच्या सामन्यात बंगळुरूचा डाव यावेळी सावरला तो एबी डि'व्हिलियर्सने. डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
या खेळीमध्ये डि'व्हिलियर्सने चक्क एका हाताने षटकार मारला आणि हा चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.

Loading...ही गोष्ट घडली सामन्याच्या 19व्या षटकात. मोहम्मद शमी हे षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डि'व्हिलियर्सने एक फटका मारला. त्यानंतर तो चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर शमी तर चक्क चेंडू शोधताना दिसला. एबीच्या या खेळीमुळं बंगळुरूनं पंजाबला तगडं आव्हान दिलं.


मोदींच्या गुजरातमधील गावाचाच लावला VIDEO, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 11:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close