IPL 2019 : असं काय घडलं की DC vs SRH या सामन्यात झाला दोनवेळा टॉस, पाहा VIDEO

IPL 2019 : असं काय घडलं की DC vs SRH या सामन्यात झाला दोनवेळा टॉस, पाहा VIDEO

आता दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम सामन्यात मुंबईशी भिडेल.

  • Share this:

विशाषापट्टणम, 09 मे : दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्लीनं शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीनं अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात महत्त्वाची भुमिका बजावली ती युवा खेळाडूंनी. मुळातच युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी हैदराबाद विरोधात आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान या सामन्यात अनेक नाट्यमय प्रकार घडलं.

दोनवेळा झाली नाणेफेक

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात एलेमिनेटर सामन्यात एकदा नाही तर दोनदा नाणेफेक करण्यात आली. झालं असं की, नाणेफेकी दरम्यान मैदानावर मॅच रेफ्री आणि दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होते. यातच समालोचक संजय मंजरेकर दोन्ही कर्णधारांची मुलाखत घेत असताना, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक केली. दरम्यान त्याचवेळी संजय मांजरेकर यांनी श्रेयसला टोकलं.

वाचा- IPL 2019 : श्रेयस म्हणतो...मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है !वाचा- IPL 2019 : आता तरी वर्ल्ड कप संघात घेणार का?, ऋषभ पंतच्या खेळीवर दिग्गजांचा सवाल

त्यानंतर पुन्हा एकदा नाणेफेक झाली. त्यानंतर पुन्हा नाणेफेक करण्यात आली त्यात दिल्लीनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान हैदराबादनं प्रथम फलंदाजी करत दिल्लीला 163 धावांचे आव्हान दिले. हैदराबादकडून विजय शंकर आणि मोहम्मद नाबी या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत 160चा आकडा पार करुन दिला. तर, या आव्हानाचा पाठलाग करताना, दिल्लीकडून पंतनं 49 धावांची तुफानी फलंदाजी केली. पंतनं केवळ 21 चेंडूत 233.33च्या सरासरीनं 49 धावा केल्या यात त्यानं तब्बल 5 षटकारांची आतषबाजी होते. तर, केवळ 2 चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावरच दिल्लीनं सामना जिंकला.

आता दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम सामन्यात मुंबईशी भिडेल.

वाचा- IPL 2019 : खलील आणि पॉलची जुनी दुश्मनी, 3 वर्षानंतरही घेता आला नाही बदला

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या