News18 Lokmat

IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाला रणवीरऐवजी हृतिक?

एका फुटबॉल मॅच दरम्यान खेळत असताना रणवीरच्या खांद्याला दुखापत झाली आणि म्हणूनच डॉक्टरांनी त्याला आरामाचा सल्ला दिलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2018 01:33 PM IST

IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटनाला रणवीरऐवजी हृतिक?

03 एप्रिल : अभिनेता रणवीर सिंग यंदाच्या आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी परफॉर्मन्स करणार असल्याचं बोललं जात होतं. एवढंच नव्हे तर या पंधरा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीर 5 कोटी इतपत मानधन घेणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता या सोहळ्याला रणवीर परफॉर्म करणार नसल्याचं समजतंय.

एका फुटबॉल मॅच दरम्यान खेळत असताना रणवीरच्या खांद्याला दुखापत झाली आणि म्हणूनच डॉक्टरांनी त्याला आरामाचा सल्ला दिलाय. आता रणवीर सिंगऐवजी या सोहळ्यात हृतिक रोशन परफॉर्म करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...