कोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये

कोलकात्याला हरवून सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीयलच्या फायनलमध्ये पोहोचलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 26, 2018 02:35 PM IST

कोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये

26 मे : कोलकात्याला हरवून सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीयलच्या फायनलमध्ये पोहोचलं आहे. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळणार आहे.

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी हा सामना होणार आहे. ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादनं कोलकात्यावर 13 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादनं कोलकात्याला विजयासाठी 175 धावांचं आव्हानं दिलं होतं.

कोलकात्यानं 20 षटकांत 9 बाद 161 धावांची मजल मारली. रशिद खानंनं 4 षटकात 19 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. शिवाय सिद्धर्थ कौलनं 2 तर कार्लोस ब्रेथवेटनं अखेरच्या षटकात 2 विकेट घेऊन हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2018 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...