S M L

सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 9 विकेट्स राखून विजय

काल झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला आणि बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, या पराभवामुळे दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 11, 2018 09:28 AM IST

सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 9 विकेट्स राखून विजय

11 मे : काल झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला आणि बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, या पराभवामुळे दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

रिषभ पंतच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर दिल्लीने 187 धावा फटकावल्या होत्या. पण त्याचे शतक व्यर्थ ठरलं. 188 धावांचे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवणार नाही, असे वाटत होते. पण सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला.

धवनने 50 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 92 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. विल्यम्सनने 53 चेंडूंत 8 चौकार आणि दोन षटकरांच्या जोरावर नाबाद 83 धावा फटकावल्या आणि धवनला सुरेख साथ दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2018 09:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close