कोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव

कोलकात्याचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, राजस्थानचे ७ गडी राखून पराभव

जयपूरच्या प्रसिद्ध सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्स संघाशी मुकाबला झाला. या सामन्यात कोलकाताने राजस्थानवर सात विकेट राखून विजय मिळवलाय.

  • Share this:

19 एप्रिल : जयपूरच्या प्रसिद्ध सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्स संघाशी मुकाबला झाला. या सामन्यात कोलकाताने राजस्थानवर सात विकेट राखून विजय मिळवलाय. राजस्थानने विजयासाठी दिलेले १६१ धावांचे लक्ष्य कोलकाताने आरामात पार केले. नितीश राणा आणि कर्णधार दिनेश कार्तिकच्या जोडीने कोलकाताच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं.

सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना यजमान राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले.

अत्यंत हळुवार सावध केलेल्या राजस्थानला कर्णधार अजिंक्य रहाणेने चांगली धावगती गाठून दिली. त्याने नरेनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत राजस्थानवरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. रहाणेने १९ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३६ धावांची खेळी केली. त्याने डी'अ‍ॅर्सीसह ५४ धावांची अर्धशतकी सलामी दिली. कोलकाताने ठराविक अंतराने बळी मिळवत राजस्थानला दबावाखाली ठेवले. नितिश राणा, टॉम कुर्रान यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६० धावा उभारल्यानंतर कोलकाताने १८.५ षटकात ३ बाद १६३ धावा केल्या.

First published: April 19, 2018, 10:10 AM IST

ताज्या बातम्या