आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव

चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे हैदराबादनं ठेवलेल्या 140 रनच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या नाकी नऊ आले होते.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 11:33 AM IST

आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव

मुंबई, 23 मे : चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे हैदराबादनं ठेवलेल्या 140 रनच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या नाकी नऊ आले होते. चेन्नई संघाने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात आएपीएलमध्ये आत्तापर्यंत सात वेळा अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या सामन्यात चेन्नई संघाला शेवटच्या तीन षटकात 43 धावांची गरज होती आणि संघाचे 7 खेळाडू तंबूत परतलेले असताना मात्र ड्यू प्लेसीनं ही खेळी पाच चौकार आणि चार षटकारांनी सजवली. आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

चेन्नईने याआधी शेवटच्या षटकात मंबई, कोलकाता आणि बंगळुरू संघाला पाभवाचा सामना करण्यास भाग पाडलं. हैद्राबाद संघाचा या सामन्यामध्ये पराभव झाला असला तरी हैदराबादला फायनल गाठण्यासाठी आणखी एक संधी आहे. दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये हैदराबादचा विजय झाला तर ते पुन्हा चेन्नईविरुद्ध फायनल खेळतील.

27 तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलची फायनल होणार असून प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे ती म्हणजे चेन्नई विरूध्द कोणता संघ आएपीएलच्या या पर्वात अंतिम सामन्यात लढणार हे पाहण्याची. चेन्नईच्या विजयाचे सर्व श्रेय ड्यू प्लेसीला जाते. त्याने आपल्या फलंदाजीत पहिल्या 24 चेंडूत 21 धावां केल्या, पण शेवटच्या 18 चेंडूत त्याने 46 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचे काम केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...