S M L

IPL 2018 : धोनीच्या आक्रमक खेळीवर ख्रिस गेल पडला भारी! पंजाबचा चेन्नईवर 4 धावांनी विजय

ख्रिस गेलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण...

Renuka Dhaybar | Updated On: Apr 16, 2018 06:59 AM IST

IPL 2018 : धोनीच्या आक्रमक खेळीवर ख्रिस गेल पडला भारी! पंजाबचा चेन्नईवर 4 धावांनी विजय

16 एप्रिल : कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या तूफान खेळीनंतरही चेन्नई सुपरकिंग्जला तीसऱ्या सामन्यात 4 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं चेन्नईला पहिल्यांदा पराभवाची चव चाखवली आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबनं अखेर चेन्नई सुपर किंग्जवर चार धावांनी विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केले. 7 गडी बाद झाल्यानंतर 20 षटकात 197 धावा केल्या. पण चेन्नईला मात्र या धावांचा  पाठलाग करता आला नाही. त्यांनी 193 धावांतच पदरी पराभव पाडून घेतला.

ख्रिस गेलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही.

पंजाबच्या 198 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांनी दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडूने चेन्नईचा किल्ला लढवला. पण दुर्देवीरीत्या तो 49 धावांवर धावचीत झाला.

रायुडू बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सारी सूत्रे हातात घेतली. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली. पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही.

Loading...
Loading...

या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावलंय. तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 06:53 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close