गेल्या 141 वर्षात जगातील या 4 फलंदाजांनी केला करिष्मा

गेल्या 141 वर्षात जगातील या 4 फलंदाजांनी केला करिष्मा

पहिल्या कसोटी सामन्यात आयर्लंडला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पाकिस्तानने यजमानांना 5 गडी राखून हरवले.

  • Share this:

16 मे : पहिल्या कसोटी सामन्यात आयर्लंडला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पाकिस्तानने यजमानांना 5 गडी राखून हरवले. या सामन्या दरम्यान असा काही करिश्मा झाला जो गेल्या 141 वर्षात कोणीही करून नाही दाखवला.

आयर्लंडच्या पहिल्या कसोटीत केविन ओ'ब्रायनने शतक झळकवताना 118 धावा केल्या. केविन ओ'ब्रायन आपल्या टीमच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा जगातील चौथ्या फलंदाज ठरला आहे.

 

जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून चार्ल्स बॅनरमनने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवले होते.

 

115 वर्षांनंतर, 1992मध्ये झिम्बाब्वेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात डेव हॉटनने प्रथम शतक झळकावलं होतं. हॉटननं हे शतक भारताच्या विरुद्धच्या सामन्यात झळकावलं होतं.

 

कोणत्याही देशात पहिल्या सामन्यात शतक करणारा तिसरा फलंदाज बांगलादेशचा अमिनुल इस्लाम आहे. अमिनुलनेही भारताविरुद्ध शतक झळकावले होते. हा रेकॉर्ड 2000मध्ये त्याने रचला होता.

 

आणि आता 18 वर्षांनंतर केविन ओ'ब्रायनने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले असून त्याचंही नाव आता या रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

First published: May 16, 2018, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading