कोलकाता नाईट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव

कोलकाता नाईट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव

कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 11व्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव केला.

  • Share this:

16 मे : कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 11व्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव केला. कोलकाताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण राजस्थानने 19 षटकांमध्ये 142 धावा केल्या. यजमानांनी 18 षटकात चार बळी गमावून हे सहज शक्य करुन दाखवलं. क्रिस लिनने कोलकातासाठी 45 धावा काढल्या तर कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद 37 धावा काढल्या.

त्याआधी, राजस्थान रॉयल्सच्या दमदार सुरवातीनंतर कोलकाताने 19 षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सला 142 धावांनी रोकलं. राजस्थानने 63 धावांच्या मोबदल्यात पहिला बळी गमावला पण उर्वरित 9 बळी केवळ 79 धावांनी गमावले. राजस्थानकडून जॉस बटलरने सर्वाधिक 39 धावा काढल्या तर राहुल त्रिपाठीने 27 धावा काढल्या.

या दोघांनंतर वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटने 18 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह 26 धावा काढल्या. राजस्थानच्या कुलदीप यादवने चार तर कृष्णा आणि आंद्रे रसेल यांने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी राजस्थानला आमंत्रण दिलं. करो या मरो अशा या सामन्यात हरणं म्हणजे खेळाच्या शर्यतीतून बाहेर पडणे असंच होतं. कारण प्लेऑफमध्ये केवळ दोन संघ निश्चित केले जातील, ज्यासाठी केकेआर आणि रॉयल्ससह 5 संघ रिंगणात आहेत. दोन्ही संघांकडे 12 गुण आहेत आणि दोन्ही संघांनी गेल्या काही सामन्यांमध्ये चांगला ताल धरला आहे.

First published: May 16, 2018, 12:37 PM IST

ताज्या बातम्या