क्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...

क्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...

धडाकेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्स काही वेळापूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला.

  • Share this:

मुंबई, 24 मे : धडाकेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्स काही वेळापूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी'व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल.

डी'व्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. ट्विटरवर डी'व्हिलियर्सने एक व्हीडीओ पोस्ट केला आणि त्यामध्ये त्याने आपण क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचे त्याने जाहीर केले.

 

एबी डी'व्हिलियर्स आएपीएलमध्ये उत्तम कामगीरीकरून नुकताच मायदेशी परतला होता. आणि अशातच त्याने आता जागतीक क्रिकेटविश्वातून निवृत्त होत आसण्याची घोषणा करत आपल्या चाहत्यानां मोठा धक्का दिला आहे. "सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपे नव्हतं. पण निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले. आतापर्यंत मला ज्या सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो" असं त्याने आपल्या निवृत्तीबद्दल म्हटले आहे.

जागतीक क्रिकेट विश्वात त्याने आपल्या नावावर अनेक विश्वविक्रम केलेले आहेत. पाहूयात त्याचे आतापर्यंतचे विश्वविक्रम थोडक्यात -

- एका सामन्यात सर्वाधिक १६ षटकार ठोकण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मासोबतच डिविलियर्सच्या नावावर जमा आहे.

- एका सामन्यात 19 मिनीटात 50 धावांची खेळी करण्याचा विक्रमसुध्दा त्याच्या नावावर आहे. सोबतच 40 मिनिटात 100 धावा करणारा डी'व्हिलियर्स पहिला खेळाडू ठरला आहे.

- अवघ्या 16 चेंडूत 60 धावां करत त्याने वनडेत सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे.

- त्याने आपल्या जागतिक क्रिकेटची सुरुवात इंग्लंडविरुध्द खेळी करत केली होती आणि विशेष म्हणजे तो सामना अगदी बरोबरीचा झाला होता.

- वनडेतील सर्वाधिक स्ट्राइक रेट ३३८.६३ हा त्याच्या नावे आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिन आफ्रिका संघाकडून वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तो ठरला आहे.

असे अनेक विक्रम करणार हे वादळ आता क्रिकेट विश्वात परत दिसणार नाही आहे. हा त्याच्या चाहात्या वर्गासाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल.

 

First published: May 24, 2018, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading