IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री

IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात लेडी गागा, कॅट पेरी आणि ब्रायन अॅडम्ससारखे नावाजलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आपली अदाकारी पेश करणार, असं म्हटलं जात होतं. पण उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री लावण्यात आल्यानं आंतरराष्ट्रीय कलाकारांचे परफाॅर्मन्सेसदेखील होणार नाहीत.

  • Share this:

03 एप्रिल : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री लावण्यात आलीय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कलाकारांची अदाकारी पाहता येणार नाही. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात लेडी गागा, कॅट पेरी आणि ब्रायन अॅडम्ससारखे नावाजलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आपली अदाकारी पेश करणार, असं म्हटलं जात होतं. पण उद्घाटन सोहळ्याच्या बजेटला कात्री लावण्यात आल्यानं आंतरराष्ट्रीय कलाकारांचे परफाॅर्मन्सेसदेखील होणार नाहीत.

यापूर्वी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 50 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आलं होतं. पण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं या गोष्टीला आक्षेप घेतला होता. त्यामुळे आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट 50 ऐवजी 30 कोटी रुपयांवर आणण्यात आलं आहे. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या संदर्भातील माहिती दिलीय.

First published: April 3, 2018, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading