.. आणि रोहित शर्माची पत्नी रितिका खूष झाली!

.. आणि  रोहित शर्माची पत्नी रितिका  खूष झाली!

  • Share this:

काल पुण्यात झालेल्या सामन्या दरम्यान मुंबई इंडियन्स संघाला चिअर-अप करायला रोहित शर्माची पत्नी देखील हजर होती. आयपीएलच्या या भागात सलग पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला अखेर काल विजयाचा सूर गवसला आहे. चेन्नई सुपर किंग्स सोबत असलेल्या या सामन्यात खरा हिरो ठरला तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा . या सामन्यात त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. तसंच ५६ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला आहे. या सामन्यावेळी रोहितची पत्नी  आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मैदानावर हजार होती. रितीकाने रोहितचा उत्साह तर वाढवलाच सोबत मुंबईच्या संघाला प्रोत्साहन सुद्धा दिलं. याआधीही आपण पाहिलेले आहे रोहितने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला द्विशतक करून भेट दिली होती. तेव्हापासूनच रोहितच्या पत्नीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...