कृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'

कृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'

आईपीएलच्या 21व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. अतिशय चुरशीच्या या सामान्यात मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 167 धावा केल्या.

  • Share this:

23 एप्रिल : आईपीएलच्या 21व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. अतिशय चुरशीच्या या सामान्यात मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 167 धावा केल्या.

रॉयल्स संघाने 2 चेंडू शिल्लक असताना, कृष्णप्पा गौतमने नाबाद 33 धावा, 11 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह धडाकेबाज फटकेबाजी करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला.

या विजयामुळे राजस्थानचा संघ 6 गुणांसह 5 व्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासमोर आज किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असून, हा सामना घरच्या प्रेक्षकांसमोर होणार असल्याचा फायदा दिल्लीच्या संघाला मिळणार असला, तरी ख्रिस गेलसह सर्व प्रमुख खेळाडूंना लय गवसलेली असल्याने पंजाबचे आव्हान त्यांच्यासाठी अवघडचं ठरण्याची चिन्हं आहेत.

 

First published: April 23, 2018, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading