S M L

आयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी?

आयपीएलच्या 11व्या सिझनची फायनल आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना होणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 27, 2018 12:07 PM IST

आयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी?

प्रथमेश मोरे, मुंबई, 27 मे : आयपीएलच्या 11व्या सिझनची  फायनल आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायर्झस हैदराबाद यांच्यात हा सामना होणार आहे.

आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा हाय होल्टेज सामना रंगणार आहे. क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं हैदराबादवर मात करून, फायनलचं तिकीट बूक केलं तर कोलकात्याचा पराभव करून हैदराबादनं फायनलमध्ये धडक मारली. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये या आधी ३ वेळा हे दोन्ही संघ एकमेकांना भिडले आहेत. मात्र हे तिन्ही सामने चेन्नई सुपरकिंग्जनं जिंकले आहेत. त्यामुळे हैद्राबादच्या तुलनेत चेन्नईचं पारड जड मानलं जातंय.

कोण आहेत चेन्नईचे पाच महाधुरंधर ?

- महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन)

- अंबाति रायडु

Loading...

- फाफ डू प्लेसी

- शार्दुल ठाकुर

- ड्वेन ब्रावो

यंग आणि बॅलन्स टीम ही तर हैदराबादची जमेची बाजू. त्यातच ऐन फायनल आधीच जोशात असणाऱ्या अफगाणिस्तानच्या रशिद खानची अष्टपैलू कामगिरी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते.

कोण आहेत  हैदराबादचे पाच महाधुरंधर ?

- राशिद खान

- केन विलियमसन (कॅप्टन)

- शिखर धवन

- सिद्धार्थ कौल

- भुवनेश्वर कुमार

मुंबईचं वानखेडे स्टेडिअम म्हणजे बॅटिंग पीच. त्यामुळे आजच्या सामन्यात सिक्स आणि फोरची बरसात तर पहायला मिळणार हे नक्कीच. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाला मोठं अॅडव्हान्टेज मिळू शकतं. त्यात समुद्र किनाऱ्यालगतचं हे मैदान बॉलर्ससाठी मात्र डोकेदुखी ठरू शकत. त्यामुळे आजच्या या फायनलमध्ये कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज बाजी मारणार की कॅप्टन केन विलियमसनची हैद्राबाद टीम ट्रॉफी जिंकणार याचीच उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2018 12:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close