आयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...

तर उपविजेती ठरलेली सनरायझर्स हैदराबाद पराभूत झाली असली तरी या टीमला 12.5 कोटींचं बक्षीस मिळणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 27, 2018 11:34 PM IST

आयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...

मुंबई, 27 मे : चेन्नई सुपर किंग्सने वानखेडे स्टेडियमवर सनराइजर्स हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवत आयपीएलच्या अकराव्या हंगामाचे जेतेपद पटकावले. या विजयासह चेन्नई मालामाल झालीये.

जगातली सर्वात महाग अशी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. चेन्नईने आज जेतेपद पटकावून तब्बल 20 कोटींचं बक्षीस पटकावलंय. मागील वर्षी मुंबई इंडियन्सने 15 कोटींचं बक्षीस पटकावलं होतं. पण या वर्षी बक्षीसाच्या रक्कमेत 5 कोटीने वाढ करण्यात आली होती.

तर उपविजेती ठरलेली सनरायझर्स हैदराबाद पराभूत झाली असली तरी या टीमला 12.5 कोटींचं बक्षीस मिळणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन आॅरेंज कॅपचा मानकरी ठरलाय. तर किंग्स इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अँड्र्यू टायने 24 गडी बाद करून सर्वाधिक गडी बाद करण्यासाठी पर्पल कॅप पटकावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2018 11:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close